हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
अंगणवाडी केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
चिमूर प्रतिनिधी :-
आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील सातारा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व सार्वजनिक समाज मंडळाच्या वतीने आयोजित वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा व अंगणवाडी केंद्राच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी आमदार बंटी भांगडियानी उपस्थित मान्यवरांसह सर्वप्रथम शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करून अभिवादन केले व फीत कापून अनावरण केले. त्यांनंतर गावातील अंगणवाडी केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले. श्री गुरुदेव सेवा मंडळ येथे जाऊन राष्ट्रसंतांचे मनोभावे दर्शन घेतले व कार्यक्रम स्थळी सर्व थोर महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले आणि उपस्थित गुरुदेव भक्तांना विविध विषयांवर संबोधित केले. दरम्यान, सातारा वासीयांच्या वतीने आमदार बंटीभाऊंचे आगमनाप्रसंगी उपस्थित माता-भगिनींनी औक्षण करत स्वागत केले व शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री हेमराज दांडेकर, चिमूर कृ.उ.बा. समिती सभापती मंगेश धाडसे, चिमूर कृ.उ.बा. समिती उपसभापती रविंद्र पंधरे, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाशजी बोकारे, भाजपा तालुका कोषाध्यक्ष रमेशजी कंचर्लावार, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा मायाताई नन्नावरे, भाजपा अनुसूचित जमाती आघाडी तालुकाध्यक्ष तथा सरपंच ग्रा.पं. सातारा गजानन गुडधे, भाजपा नेते विलास कोराम, माजी सभापती/नगरसेवक न.प. चिमूर सतीश जाधव, भाजयुमो तालुका महामंत्री रोशन बन्सोड, भाजयुमो चिमूर शहर महामंत्री श्रेयश लाखे, सरपंच ग्रा.पं. कन्हाळगाव विजय घरत, भाजपा बूथ अध्यक्ष भाग्यवान ढोणे, वर्षाताई नन्नावरे, जे.आर. गुप्ता, रतिराम कोडापे, रविंद्र चौधरी, वामन बावणे, योगेश सहारे, कैलास जांभुळे, दिनेश कोडापे, सूरज ढोणे, बबन शेरकुरे व अन्य मान्यवर आणि गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.